आरपीआय (A) गटाच्या वडूज येथील बैठकीत विविध महत्वपूर्ण निर्णय व नवनियुक्त पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

खटाव/(वडूज), सातारा, १९ जानेवारी २०२४ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने १८ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील वडूज येथील शासकीय विश्रामगृहात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात काही मुद्दे मांडण्यात आले. या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खटाव तालुका कार्याध्यक्ष सुनील मिसळ यांचे पद काही कारणास्तव जिल्हाध्यक्षांच्या आदेशाने रद्द करून हे पद सचिन भंडलकर यांना देण्यात आले आहे. तसेच रोहित भिलारे यांची खटाव तालुका सचिव पदी, विजय यादव यांची खटाव तालुका सल्लागार पदी, महिला आघाडी खटाव तालुका कार्याध्यक्ष पदी ज्योती यादव, खटाव तालुका युवक अध्यक्षपदी अमोल बुधावले, प्रशांत भोडवे यांची वडूज शहराध्यक्षपदी, मंगेश माने यांची खटाव तालुका कोषाध्यक्ष पदी, दीपक पाटोळे यांची कोरेगाव तालुका संघटक पदी आणि सचिन आगरकर यांची खटाव तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पार्टीचे आरटीसीएलचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी दिली.

सदर बैठक पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे (डॅडी) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तसेच या बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवाजीराव सर्वगोड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आरटीसीलचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, सातारा जिल्हा युवक सचिव अनिल उमापे, कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी, सुनील ओव्हाळ, अनिल ओव्हाळ, अतुल गरड, माण तालुका अध्यक्ष सनी खरात आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्टीचे कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांनी केले आणि पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सर्वगोड सर यांनी आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा