एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

24

मुंबई :  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपमध्ये खडसे नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी मी कधीही पक्ष सोडणार असल्याचा ईशारा त्यांनी दिला होता. मात्र खडसेंच्या प्रवेशाबाबत सर्वांच्या मनात गूढ होते.

एकनाथ खडसे यांनी दिल्लीला जाऊन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर उध्दव ठाकरे यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी खडसे काँग्रेसमध्ये आले तर स्वागतच असे विधान केले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादी – शिवसेना – काँग्रेस यातील कोणत्या पक्षात जाणार ? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा