नागपूरच्या शिवाजी सभागृहात माथाडी कामगार सेने तर्फे हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

नागपूर,९ फेब्रुवारी २०२४ : माधवबाग हॉस्पिटल कोंढाळी आणि माथाडी कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबीर व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन शिवाजी सभागृह दत्तात्रय नगर हुडकेश्वर रोड येथे गुरुवारी पार पडले. कार्यक्रमाला आमदार अभिजीत वंजारी, काँग्रेस नेते गिरीश पांडव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शंभराच्या वरील नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी ईसीजी, ब्लड प्रेशर चेकअप, रँडम ब्लड शुगर, हार्टरेट, पल्स रेट, बीएम आय आदी तपासण्या नाममात्र २० रुपये शुल्कात करण्यात आल्या. शिवाजी सभागृहाच्या संचालकांनी हॉल देऊन सहकार्य केले. सर्वश्री पुरुषोत्तम तातोडे, सुभाष गुजर, विलासराव इटनकर, धनराज आकोटकर, बांडाने साहेब, श्याम कामत, भानुदास खेडकर, शंकरराव चौधरी, गौतम मेश्राम, भोला पटेल, दुरुगकर, अंजनकर,आशा कोमजवार, ममता बावणे, प्रिया यादव, माया वर्मा आदींनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संयोजन आशिर्वाद नगर जेष्ठ नागरिक गार्डन क्लब व शिवसेनेच्या माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सिद्धेश्वर कोमजवार, विजय कडू, वामन साळवे, डॉ. दीपकराव शेंडेकर, माधुरीताई घोसेकर, विनायकराव वाघ, किसन गनेरकर, यांच्या पुढाकाराने करण्यात आले. डॉ. कीर्ती सावरकर, प्रीती श्रीवास, अविनाश चरडे, पूनम मांडवगडे यांनी आरोग्य तपासणी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा