नांदगावला ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा ११ वा दिवस

नांदगाव, नाशिक २० फेब्रुवारी २०२४ : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेतले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारं विधेयक विधीमंडळात मांडलं आहे. परंतु एकीकडे राज्य सरकारने स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलावलेलं असलं तरी दुसरीकडे मात्र मनोज जरांगे पाटलांनी स्वतंत्र आरक्षणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे, स्वतंत्र आरक्षण नको. कारण ते टिकेल की नाही याची शाश्वती नाही, अशी भूमिका नांदगाव येथिल उपोषणकर्ते यांनी मांडली आहे. आम्हाला सगेसोयऱ्याचं आरक्षण पाहिजे. त्यासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. नाहीतर पुढील आंदोलनाची दिशा उद्या निश्चित करणार असल्याचं उपोषणकर्ते भास्कर झाल्टे, विशाल वडघुले, भीमराज लोखंडे, विष्णू चव्हाण, निवृत्ती खालकर यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा