भोकरदन शहरात भगवान श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी;शहरात भव्य मिरवणूक

12

भोकरदन, २३ फेब्रुवारी २०२४ : भोकरदन शहरात सकल विश्वकर्मीय समाज व श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समितीच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त श्रीची प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरात पहील्यांदाच भव्य मिरवणुक निघाल्याने या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते. मिरवणूकीत भोकरदन-जाफराबाद तालुक्यातील सोनार, सुतार व लोहार समाजासह सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिति होती. शहरातील मिरणुकीला डाॅ. हेडगेवार चौकातून भगवान श्री विश्वकर्माच्या प्रतिमा असलेल्या रथाची पुजा करत सुरुवात करण्यात आली. सदरील मिरवणुक मेन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर या ठिकाणी भगवान श्री विश्वकर्मा आणि छत्रपती शिवाजी महारांची आरती करण्यात आली. या आरती प्रसंगी शहरातील सर्व पक्षीय नेते आणि सर्व समाज बांधव सहभागी झाल्याने ही जयंती शहरात एक आगळीवेगळया पध्दतीने साजरी झाल्याचं दिसून आले. यांनतर श्री कृष्णा लॉन्समध्ये या भव्य मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या यानंतर महाप्रसादाला सुरूवात करण्यात आली होती.

यावेळी निघालेल्या मिरवणुकीत माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष ऍड. हर्षकुमार जाधव, माजी जि. प. सदस्या आशालाई पांडे, माजी उपनगराध्यक्ष शब्बीर कुरैशी, मुजीब हाजी, माजी सभापती लक्ष्मण दळवी, रामेश्वर सहकारी साखर कारखाण्याचे चेअरमन विजय परिहार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादसिग राजपुत, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाउपाध्यक्ष मनिष श्रीवास्तवी, हुकुमसिंग चुंडावत, योगेश शर्मा, शिवसेना शिंदे गटाचे भूषण शर्मा, नानासाहेब वानखेडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने, रत्नमाला लॉन्सचे संचालक बाळासाहेब जाधव, राजेंद्र देशमुख, डॉ. के. एन. राजपुत, लोकजागर संघटनेचे अध्यक्ष केशव जंजाळ, माजी उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, माजी नगरसेवक रणांवरसिंह देशमुख, अब्दुल कदीरवाणु, राहुल ठाकुर, दिपक बोर्डे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष फकिरा देशमुख, मनोज थारेवाल, सामाजिक कार्यकर्ते नारायण जिवरग, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष विलास शिंदे, राजेंद्र दांरुटे, गणेश ढोके, महेश पुरोहित, सुरेश तळेकर, एजाज शाह, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष कडुषा बोरसे, सुरेश शर्मा, सतिष रोकडे, विजय मिरकर, सुमित थारेवाल, महेश औटी, रामचंद्र गायके, काकासाहेब साबळे, जनार्धन सोळंके आदी राजकीय, सामाजिक मान्यवर सहभागी झाले होते.

दरम्यान या जंयती उत्सावाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहन हिवरकर, उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन सोनवणे, उपाध्यक्ष किशोर हिवरकर, सचिव रामदास पाथरकर, माजी जि. प. सदस्य संजय पोखळे, कृष्णा हिवरकर, किशोर शर्मा, किशोर सराफ, सुधाकर इंगळे, गणेश गण्णाराव सालवण, आमजी जागिह, किशोर सराफ, प्रकाश सोनवणे, मारोती दळवी, विकास हिवाळ, डॉ. राम सोनवणे, सागर हिवरकर यांच्यासह सोनार, सुतार, लोहार समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

या मिरवणुकीत श्री नागेश्वर बाबा शिक्षण संस्था तथा गुरूकुल आश्रमाच्या विद्यार्थी टाळमृदुंगासह मिरवणुकीत दाखवलेल्या कलांनी रंगत वाढली होती. याशिवाय या मिरवणुकीत पुष्पवृष्टी करण्यात आल्याने देखील या सोहळ्याला भक्तीमय वातावरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ह. भ.प शंकर महाराज साबळे, विठ्ठल महाराज शिरसाठ, ह. भ. प. अमोल महाराज मिरगे, बालाजी मात्र उबाळे, जितील महाराज शिदे यांचे मोलाचे योगदान मिळाले.

न्युज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे