कन्नड, छत्रपती संभाजीनगर, २३ फेब्रुवारी २०२४ : छत्रपती संभाजी नगर येथील कन्नड तालुक्यातील एका २३ वर्षीय मुलाने आपली जीवनयात्रा संपवण्याची घटना समोर आली आहे. भोलेश्वर कॉलनी येथे राहणार शिवम उर्फ (करन) देवसिंग राजपूत याला काल सकाळी ठवण्यासाठी आवाज दिला. मात्र त्याने कोणताच प्रतिसाद दिला नसल्यामुळे त्याचे घरचे घाबरले. त्यांनी आजूबाजुला असलेल्या शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली आणि मदत मागितली. दार तोडून आत प्रवेश केला असता शिवम हा घरातील पंख्याला साडीने गळफास घेतल्याचा अवस्थेत दिसून आला. त्यास तत्काळ कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. माटे यांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : रविंद्र खरात