गरुड झेप अकॅडमी मध्ये एका तरुणीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर, २३ फेब्रुवारी २०२४ : बजाज नगरातील अकॅडमी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका १९ वर्षी मुलीने २० फेब्रुवारीला बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी संचालकाच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने अकॅडमी वर छापा मारला. पथकाने अकॅडमी वसतिगृह आणि खानावळ याची झडती घेतली असता. वसतिगृहात मुलांची राहण्याची व्यवस्था अक्षरशा कोंडवाडाप्रमाणे केली असल्याचे समोर आले आहे. नोकरीच्या अमिष व विविध सुविधा दाखवून मुलांकडून पैसे घेतले जातात. त्यानंतर सुविधा पुरवल्या जात नसल्याच्या तक्रारी मुलांनी पथकाकडे केल्या आहेत. एका रूममध्ये २२ मुले राहत असून शौचालय अस्वच्छ आहे. जेवणाची व्यवस्था चांगली नाही. शिवाय वीज नसल्याने वस्तीगृहात अंधार असल्याचे या तपासणी समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केल आहे की, जर तुमच्या सोबत काही अन्याय अत्याचार झाला असेल तर त्यांनी तात्काळ तक्रार द्यावी. मुलीच्या आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असून पुढील तपास सुरु आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : संजय आहेर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा