घरफोडीतील आरोपींच्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी आवळल्या मुसक्या, सहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल केला जप्त

उदगीर, २३ फेब्रुवारी २०२४ : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बिदर गेट दत्त नगर येथे अभय बाबुराव जाधव यांच्या घरी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री घरफोडी झाली होती. याप्रकरणी १ सप्टेंबर २०२३ रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन ५२८/२३ कलम ४५४, ३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत होते.

घरफोडीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या सूचनेनुसार उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल राम बनसोडे, पोलीस नाईक नाना शिंदे, पोलीस नाईक स्वामी, पोलीस अंमलदार नामदेव चेवले, राहुल गायकवाड, राजू घोरपडे या पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक सोबत घेऊन घरफोडीतील आरोपी सुमित दगडू गर्गेवाड रा. मळवटी रोड लातूर, आणि गजविरसिंग नरपतसिंग राठोड रा. पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे या आरोपीच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

आरोपींना ताब्यात घेऊन पुणे, बीड, धाराशिव येथे जाऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्याचे १०५ ग्रॅमचे दागिने (किंमत सहा लाख तीस हजार रुपय) ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केले आहे. घरफोडीतील मुख्य आरोपी सुमित दगडू गर्गेवाड यांना धाराशिव येथून अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी गजविरसिंग नरपतसिंग राठोड यांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : सुधाकर नाईक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा