माणगांव तालुक्यातील धरणाचीवाडी स्मशानभूमीत रात्रीस जादूटोन्याचा खेळ

44

माणगांव, २० मार्च २०२४ : मुंबई गोवा हायवेलगत वावेदिवाळी नदीशेजारी धरणाची वाडी ग्रामस्थाची स्मशानभूमी असून या स्मशानभूमीत अमावस्या, पौर्णिमेला तसेच रविवार, मंगळ, शुक्रवार या दिवशी मोठ्या प्रमाणात काळ्या जादूचा खेळ चालत असून या जागी नरबळीसारखी मोठी घटना घडण्याची शक्यता धरणाची वाडी मधील नागरीकांना आहे.

धरणाची वाडी गावापासून ही स्मशानभूमी दोन किलोमीटर अंतरावर असून गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि हे ग्रामस्थ स्मशानभूमीवर गेले की त्यांना नेहमीच येथे जादूटोण्याचा प्रकार दिसून येतो. गेल्या तीन ते चार वर्षापासून या स्मशानभूमीत तसेच आजूबाजूला नारळ, कुवाळा, बाहुल्या, चोळीचा खण, घुगरूवाली काठी, लिंबू, मडकी, टाचण्या, दारूची बाटली, पान, सुपारी, आभिर, गुलाल, शेदूर हे सर्व टोपलीत भरून या परिसरात सर्वत्र ठेवलेले दिसून येत आहे.

या प्रकरणाची येथील ग्रामस्थांनी आता माणगांव पोलिस लेखी तक्रार केली असून गावातील काही भगतगीरी करणार्‍या बाबा-बुवांची नावे ते देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव