सुप्रिया सुळे यांनी आज ‘सारथी’ला भेट दिली

पुणे: सारथी’वर निर्बंध लादल्याच्या पार्श्‍वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आज ‘सारथी’ला भेट दिली. तेथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि या संस्थेच्या कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली. विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे प्रश्न ह्या वेळेस सुप्रि या सुळे यांनी समजून घेतले. सारथी वाचवण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी मागणीही यावेळी विद्यार्थ्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. सारथी च्या माध्यमातून कुणबी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आशेचा किरण मिळाला आहे असेही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.  या माध्यमातून अनेक योजना तरुणांसाठी राबविल्या जात आहेत. पण निर्बंध लादल्याने ‘सारथी’मार्फत मिळणारी पाठ्यवृत्ती बंद होण्याचा धोका असल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांना भेटण्यापूर्वी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांची भेट घेतली.
यावेळी येथे बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेबाबत निर्माण झालेल्या प्रश्‍नांसंदर्भात (सारथी) राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. यासंबंधी जारी करण्यात आलेल्या आदेशामुळे तरुण विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत, यासंबंधी राज्याच्या मुख्य सचिवांबरोबर चर्चा करणार  असल्याचे त्यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा