सुपारीने सुद्धा होतो कॅन्सर?

28

सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सर होतो हे आपणा सर्वांना माहीत आहे. मात्र तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सुपारी खाल्याने सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. एका सर्वेक्षणात ही धक्कादायक बाबसमोर आली आहे.

याबाबत तज्ज्ञांनी सांगितले आहे की, ५ टक्के लोक दरवर्षी सुपारी खाल्याने कॅन्सरला बळी पडत आहेत. त्याचबरोबर तंबाखू आणि गुटखा खाल्याने २० ते ३० वर्षे वयातील अनेक तरुण कॅन्सरला बळी पडत आहेत. तंबाखू सोडल्यानंतर सुद्धा १० ते १५ वर्षांनी कॅन्सर होण्याचा धोका असतो.

तोंडाच्या आतील बाजूस लाल डाग असल्यास किंवा तोंड उघडण्यास त्रास होत असल्यास, तोंडाला किंवा गळ्याला सूज आल्यास, हिरड्यांमध्ये सूज असल्यास कॅन्सरचे निदान करणे गरजेचे ठरते. अनेक तज्ज्ञांनी वेळोवेळी तरुणांना व्यसन न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कॅन्सर नको असेल तर व्यसनांना सुद्धा नाही म्हणने अत्यंत आवश्यक आहे.