दीपिका पुन्हा डिजलसोबत झळकणार?

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉलिवूड अभिनेता विन डिजलसोबत पुन्हा एकदा चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे.
याआधी दीपिका विनसोबत २०१७ मध्ये ‘ट्रिपल एक्‍स’ या चित्रपटात झळकली होती. आता त्याच चित्रपटाच्या पुढील भागात अर्थात ‘जेंडर केज ४’ या चित्रपटामध्ये दीपिकाला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
विन डिजलने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या खाली लिहिलेल्या ओळींमध्ये शेवटी त्याने दीपिकाच्या नावालाही हॅशटॅग केले आहे. यामुळे आगामी चित्रपटात दीपिका विनसोबत झळकणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा