गौतमी पाटीलचा ‘घुंगरु’ हा सिनेमा येत्या १५ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला, आज पंढरपुरमध्ये या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज

पंढरपूर, सोलापूर १ डिसेंबर २०२३ : महाराष्ट्राला आपल्या नृत्याने वेड लावणारी नृत्यांगना, सबसे कातील गौतमी पाटील ही आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. गौतमीच्या आगामी ‘घुंगरु’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि ट्रेलर आज लॉन्च झाल. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असुन तीचा ‘घुंगरु’ हा सिनेमा येत्या १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेप्रेमींमध्ये या सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. आज पंढरपुरमध्ये या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाले. या सिनेमात लव्हस्टोरी, लोककलावंतांचं आयुष्य त्यांचा संघर्ष, रहस्य अशा सर्वच गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

गौतमीच्या पहिल्यावहिल्या ‘घुंगरु’ या सिनेमाची सध्या सर्वत्र खूप चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. ‘नृत्यांगना आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील तिच्या नृत्यामुळे कायम चर्चेत असते, पण आता ती तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आलीय. ‘घुंगरु’ या सिनेमात गौतमी एका लावणी कलावंताची भूमिका साकारत असुन हा सिनेमा लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे गौतमीसाठी नक्कीच हा सिनेमा खूप खास असेल.

सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत असुन बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या निर्माता, दिग्दर्शनाची तसेच कथा-पटकथेचीही धुरा सांभाळली आहे. सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सोलापूर, माढा आणि हंपीसह परदेशात या सिनेमाचं शूटिंग झालं आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिल्लारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा