जालना १९ जुलै २०२४ : जालन्यात २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलय. तरी सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घेवून आपली प्रकरणं लोकअदालत मध्ये ठेवावीत व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रणिता पी. भारसाकडे-वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केलय.
जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय आणि इतर सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असणारे मोटार वाहन अपघात कायद्या अंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम १३८, एन.आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणं व इतर प्रकरणे तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणं इत्यादी प्रकरणांसाठी दिनांक २७ जुलै २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आलय.
न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी