नागपूर २३ जुलै २०२४ : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने नागपूर शहरात वाताहत झाली होती. दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील रामबाग, इमामवाडा, जातरोडी या क्षेत्रात पावसाने थैमान घातले होते. अशातच टीव्ही वॉर्ड कडून जाणारा मोठा नाला फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झालंय. मागच्या वर्षीही हीच स्थिती उद्भवली असताना, यावेळी प्रशासनाने कुठलीही पूर्वतयारी केली नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये दोन ते तीन फूट पाणी शिरले होते. त्यांच्या घरातील अन्नधान्य, पाठ्यपुस्तके, महत्त्वाचे कागदपत्रे, कापड, फर्निचर्स इलेक्ट्रॉनिक वस्तू या सर्वांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले असून मागच्यावर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही, त्यातच यावर्षी सुद्धा नुकसान नागरिक हतबल झाल्याचं चित्र नागपुरात दिसतंय. या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आक्रमण युवक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
काय आहेत मागण्या..
१) मागील वर्षी २३ सप्टेंबर २३ ला पडलेल्या पावसाने झालेले नुकसान तसेच याही वर्षी झालेले नुकसान याची शासनातर्फे नुकसान भरपाई लवकर देण्यात यावे
२) नुकसानग्रस्त घराचे सर्वे करून त्यांना प्रत्येकी २५००० आर्थिक नुकसान मोबदला देण्यात यावा
३) इमामवाडा क्षेत्रातील टीबी वाट काढून थेट नाग नदीकडे जाणारा नाल्याचे रुंदीकरण करून मजबूतपणे त्वरित बांधण्यात यावे
४) इमामवाडा रामबागला आपातग्रस्त घोषित करून दारिद्र रेषेखालील नागरिकांना बीपीएल कार्ड देण्यात यावे
५) आपातग्रस्त नागरिकांचे सर्वेकरून सर्व घरांना मालकी हक्काचे पट्टे त्वरित पट्टे वितरण करण्यात यावे, अशा सर्व मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी आक्रमण युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले. सोबत जिल्हा प्रभारी विशाल बनसोड, शहराध्यक्ष मुस्तुरी वारसी, जिल्हा ग्रामीण प्रभारी आतिश शंम्भरकर, सचिव अश्विन पाटील, प्रफुल खोब्रागडे, रितेश ढेगरे,तसेच समस्त पिडीत नागरीक व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे