विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी नागपूरचे पोलीस आयुक्त सिंघल यांनी घेतली बैठक

नागपूर २४ जुलै २०२४ : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक संबंधी स्कूलबस धोरणानुसार महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस करिता विनियम) नियम २०११ नुसार स्कूलबस सुरक्षा समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित शाळेत ने-आण करणे हा आहे. नागपूर शहरामध्ये सध्या सर्वचं शाळा महाविद्यालय सुरू झालेले आहे. त्या दृष्टिकोनातून मुलांची सुरक्षा, परिवहन शुल्क, बस थांबे निश्चिती, स्कूलबस वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण, वाहन चालविण्याचे लायसन्स, अग्निशामक, प्रथमोपचार पेटी, शाळेच्या मालकीच्या स्कूलबस, परवाना शुल्क, कंत्राटी स्कूल बस इत्यादी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याकरिता मा.पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल, नागपूर शहर यांच्या अध्यक्षतेखाली काल पोलीस भवन, पोलीस आयुक्त कार्यालय, सिव्हिल लाईन नागपूर येथे जिल्हा स्कूल व सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीकरिता परिवहन व्यवस्थापक मनपा, विभागीय नियंत्रक एमएसआरडी, शिक्षणाधिकारी( प्राथमिक /माध्यमिक), नागपूर पूर्व व दक्षिणचे DRTO व ARTO तसेच स्कूल बस संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत १. प्रत्येक शाळेमध्ये सुरक्षा समिती अनिवार्य असायला पाहिजे.२. प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे व काय नाही ? याबाबत धोरणे निश्चित करायला पाहिजे.३. संपर्काकरिता हेल्पलाइन नंबर सुरू करणे. ४. शाळेचे विद्यार्थी ने-आण करणारे स्कूल बस यांचे चालक यांना प्रशिक्षण देणे. ५. मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये याकरिता शाळेचे वाहन चालक यांनी खर्रा खाऊन वाहन चालवू नये. ६. शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम करणारे अपायकारक ड्रग्ज पासून होणारे नुकसान यावर स्कूल बस सुरक्षा समितीने जनजागृती वर भर देणे. ७.विद्यार्थी आणि पालकांना कमिटीमध्ये समाविष्ट करणे. ८. स्कूल बसचे ड्रायव्हरची माहिती आरटीओ व पोलीस वाहतूक विभाग यांना शिक्षणाधिकारी यांनी देणे इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

सदर बैठकीत पोलीस आयुक्त यांनी *सर्व विभागाने तितक्याच जबाबदारीने वागून पुढे समाजामध्ये घडणारी पिढी विद्यार्थ्यांच्या रूपाने त्यांना मदत व त्यांची सुरक्षा व काळजी घेऊन केली पाहिजे, यात हयगय होता कामा नये, अशा कडक शब्दात सूचना दिल्यात. सदर बैठकीत अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री संजय पाटील, पोलीस उपायुक्त श्री .शशिकांत सातव वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग नागपूरचे श्री हर्षल डाके, अश्फाक अहमद, शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री सिद्धेश्वर काळुसे, शिक्षण अधिकारी माध्यमिक श्रीमती रोहिणी कुंभार, तसेच नागपूर शहर पोलीस वाहतूक शाखा सोनेगाव, सक्करदरा ,कामठी, अजनी ,इंदोरा, कॉटन मार्केट, लकडगंज, सदर चे पोलीस अधिकारी, नागपूर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक श्री माहुलकर इत्यादी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा