जामनेर २७ जुलै २०२४ : जामनेर येथील पोलीस स्टेशनचे सिंघम म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची विनंती बदली अहमदनगरला झाली असून त्यांचा जागेवर जळगाव सायबरला असलेले पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार हे जामनेर पोलीस स्टेशनला रुजू झाले. त्यांनी किरण शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना जामनेर पोलीस स्टेशनला तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांनी विनंती बदली घेतली आहे. त्यांच्या तीन वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं असुन अतिक्रमण, गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना आळा घालणे यासोबतच त्यांनी अनेक गुन्हे उघडकिस आणले आहे. जामनेर तालुक्यात सिंघम म्हणून ओळख असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख नेहमी आठवणीत राहणारी आहे. किरण शिंदे यांना जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने निरोप देताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : भानुदास चव्हाण