मनमाड, नाशिक ७ ऑगस्ट २०२४ : नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या भारतीय खाद्य निगमध्ये, कंत्राटी पद्धतीने हमाली काम करणाऱ्या दिलखुश छेदी चौधरी या परप्रांतीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या खाद्य निगमच्या शेड नंबर ८८ च्या बाहेरील खिडकीला गळ्यात असलेल्या उपरण्याच्या सह्याने त्याने गळफास घेतलाय.
मयत दिलखुश हा मूळचा बिहार राज्याचा रहिवाशी असून, ठेकेदाराच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या अगोदर आठवडा भरा पूर्वी ठेकेदारांच्या मनमानी कारभाराविरोधात एक दिवशीय उपोषण देखील करण्यात आले होते. याबाबत मनमाड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून,पोलीस अधिक तपास करीत आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे