जालना ३ सप्टेंबर २०२४ : पोळा सण साजरा करणं तरुणाच्या जीवावर बेतलय. पोळा निमित्त गावालगत असलेल्या ओढ्यावर बैल धूत असताना विद्युत शॉक लागून एकाचा दुर्दैवी झाल्याची घटना काल घडलीय. विठ्ठल देविदास जाधव रा. धावेडी असे मयत तरुणाचे नाव आहे.
जालना तालुक्यातील धावेडी गावामध्ये राहणारे विठ्ठल जाधव हे बैल पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी जवळच असलेल्या ओढ्यावर गेले होते. ओढ्यावरील पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता, त्या पाण्याचा स्पर्श झाल्याने विठ्ठल यांना शॉक लागला. त्यामुळे ते खाली पडले, परिसरातील नागरिकांनी तात्काळ विठ्ठल यांना जालना येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले, परंतु डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेचा तपशील घेतला. पोलिसांनी सदर तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठविलाय. या घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत. दरम्यान या दुर्दैवी घटनेने जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी