नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (दि.२०) रोजी सायंकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहे.
उत्तर भारतात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जीवमुठीत घेऊन असंख्य लोकांना भीतीपोटी घराबाहेर तसेच कार्यालयाबाहेर पडावे लागले. दरम्यान, भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचं कोणतीही हानी झाल्याचे अद्याप समजलेले नाही.