रायगड ३ फेब्रुवारी २०२५ : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी या नियुक्तीवरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला.
चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, “दोन दिवसांत गोड बातमी मिळेल,” असे गोगावले यांनी सांगितले होते. मात्र, दोन दिवस उलटूनही निर्णय न झाल्याने त्यांनी आता नवीन वेळसीमा जाहीर केली आहे.
रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना गोगावले म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस दिल्लीत होते. त्यामुळे आणखी दोन दिवसांत हा निर्णय अपेक्षित आहे. पालकमंत्री पद शिवसेनेकडेच येणार याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.”
रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार असल्याने हे पद आपल्या पक्षाकडेच असावे, अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी काही तासांत रायगडच्या पालकमंत्री पदावर अंतिम निर्णय घेतला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे