धनंजय मुंडे आणि हार्वेस्टर घोटाळ्यावरील मनोज जरांगे पाटील यांची टीका

13

बीड 3 फेब्रुवारी २०२५: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पीकविम्यासह हार्वेस्टर घोटाळ्यामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे सध्या टीकेचे धनी ठरले आहेत. याच संदर्भात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे की, हार्वेस्टर खरेदीसाठी पैसे दिलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

जरांगे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे की, विधानसभा निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे यांनी त्यांना भेटण्यासाठी सात-आठ दिवस वारंवार निरोप पाठवला होता. “त्यांच्या भेटीचे निमंत्रण आल्यानंतर मी काही वेळा त्यांना भेटू शकलो नाही, परंतु एक रात्री दोन वाजता ते मला भेटायला आले होते,” असं जरांगे म्हणाले.

तसेच, हार्वेस्टर घोटाळ्यावरील आपली प्रतिक्रिया देताना, जरांगे यांनी सांगितले की, हार्वेस्टरसाठी पैसे दिलेल्या शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली होती आणि त्यांच्या तक्रारीनुसार त्यांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना फोन करून त्वरित कारवाई करण्याचे सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा