१० फेब्रुवारी २०२५ कटक : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी भारतासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रोहित शर्माने कटकमध्ये आक्रमक शतक झळकावत शानदार पुनरागमन केले आहे. मागच्या काही दिवसांपासून कर्णधार रोहित शर्मा चांगल्या फॉर्मसाठी झुंज देत होता. त्यामुळे चाहत्यांकडून त्याच्यावर जोरदार टीका देखील होत होती. अखेर ही झुंज संपली असून ट्रॉल करणाऱ्या चाहत्यांना त्यान चांगलच प्रतिउत्तर दिलंय. रोहित शर्माने अवघ्या ९० चेंडूत ७ षटकार आणि १२ चौकरांच्या मदतीने ११९ धावा पूर्ण केल्या. रोहितचे हे वनडे क्रिकेट मधील ३२ वे शतक होते. त्याचबरोबर त्याचे एकदिवसीय सामन्यातील दुसरे सर्वात जलद शतक आहे.


रोहित शर्माला मागच्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चाहत्यांकडून जोरदार टीकांचा सामना करावा लागला होता. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात देखील रोहित धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्यानंतर एका चाहत्याने लिहिले होते की, “त्याने आता निवृत्त व्हावे तसेच दुसरा चाहता म्हणाला की, त्याची शैली चांगली आहे की तो लवकर आउट होतो. रोहित आता भारतीय संघासाठी ओझे बनत आहे.” असे सोशल मीडियावर चाहत्यांनी टिप्पणी केली. या चाहत्यांची त्याने आता चांगलीच बोलती बंद केली आहे.
रोहितने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३८ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४७५ दिवसानंतर शतक झळकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा हंगाम सुरू होण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत यातच रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये आला आहे. ही बाब भारतीय संघासाठी आनंदाची आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारे फलंदाज :
विराट कोहली – ५० शतक
सचिन तेंडुलकर- ५० शतक
रोहित शर्मा – ३२ शतक
रिकी पाँटिंग – ३० शतक
सनथ जयसूर्या – २८ शतक
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर