अहमदाबाद १३ फेब्रुवारी २०२५ : भारत आणि इंग्लंड यांच्यात बुधवारी अहमदाबाद येथे वनडे मालिकेचा तिसरा सामना खेळवण्यात आला. ज्यात टीम इंडियाने १४२ धावांनी विजय मिळवला आहे. येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही वनडे मालिका खूप महत्वाची होती. काही दिवसांपूर्वीच या दोन्ही उभय संघात ५ सामन्याची टी-२० मालिका सुद्धा खेळवण्यात आली होती. कर्णधार सूर्यकुमार यादवाच्या नेतृत्वाखाली भारताने ही टी-२० मालिका ४-१ ने जिंकली होती. त्याचबरोबर आता कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका ३-० ने जिंकली आहे. आता टीम इंडियाचे लक्ष येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर असणार आहे.
भारतीय संघाची प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवात चांगली राहिली. सलामीवीर शुबनम गिलने शानदार शतक झळकावले त्याने १०२ चेंडूत ११२ धावा केल्या. त्याचबरोबर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी अर्धशतकाची खेळी केली. श्रेयसने ६४ चेंडूत ७८ धावा तर विराटने ५५ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. के.एल राहुलने सुद्धा ४० धावा करत संघासाठी मोठे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्मा लवकर आऊट झाला. मागच्या सामन्यात रोहितने शानदार शतक ठोकत आपल्या जुन्या फॉर्ममध्ये पुनरागमन केले होते. मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात सुद्धा तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा अपयशी ठरली.
बुधवारी झालेल्या वनडे मालिकेच्या तिसऱ्या सामन्यांत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५७ धावांचे मोठे लक्ष इंग्लंड संघासमोर ठेवले होते. या मोठ्या धावांचा पाठलाग करताना इंग्लिश संघ अवघ्या ३४.२ षटकांत २१४ धावांवर बाद झाला. इंग्लंड संघाकडून कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. सलामीवीर फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी इंग्लंड
संघासाठी आक्रमक सुरुवात करून दिली होती. फील सॉल्ट २१ चेंडूत २३ धावा तर डकेट याने २२ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर