पुणे, बारामती १९ फेब्रुवारी २०२५: पुणे ज्याला शिक्षणाचे माहेर घर समजले जाते अशा पुण्यात महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून विद्यार्थी शिकायला येत असतात. पण पुण्यात दिवसेंदिवस वेगवेगळ्या आजारांचे संकट वाढत आहे आधी करोना मग आता GBS यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच काल एक धक्कादायक बातमी घडली आहे. ती म्हणजे शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या (२१) वर्षीय तरुणीचा GBS च्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला आहे. किरण देशमुख असे मृत्यू झालेल्या तरुणीच नाव असून ती गेल्या तीन आठवड्या पासून या आजाराशी झुंज देत होती. किरण ही मुळची बारामतीची असून पुण्यात सिंहगड परिसरात तिच्या नातेवाईकांकडे राहत होती. तिच्यावर उपचार चालू होते, परंतु उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
किरण राहत असलेल्या परिसरात GBS चे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यातच तिला देखील लागण झाली. आपल्या लागण झाल्याचे समजताच किरण आपल्या घरी म्हणजेच बारामतीला आई वडिलांकडे गेली. जुलाब आणि अशक्तपणा येत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी बारामती येथील तज्ञ डॉक्टरांकडे दाखवले. तिच्यावर उपचार सुद्धा सुरू होते, पण उपचारचा तिच्यावर काहीच फरक नसल्याने तज्ञानी शंका व्यक्त करत तिला gbsची लागण झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिला पुण्यात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. २७ जानेवारी पासून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र दिवसेंदिवस तीची प्रकृती खालवत गेली आणि तिचा मंगळवारी मृत्यू झाला.
पुण्यात १८३ रुग्णांना GBS ची लागण झाली असून २८ रुग्ण संशयित आहेत. त्याचबरोबर आतपर्यंत पुण्यात १० रुग्णांना या आजाराने मृत्यू झाला आहे. ९४ नवे रुग्ण पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट झालेल्या गावातील आहेत. यापैकी १३९ रुग्ण बरे झाले असून ३९ रुग्ण आयसीयू तर १८ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर