दिल्ली २१ फेब्रुवारी २०२५ : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bhartiy Sahitya Samelan) आजपासून सुरुवात होणार असून त्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तब्बल ७ दशकानंतर हे साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार असून यासाठी स्वागत अध्यक्ष म्हणून शरद पवार (Sharad Pawar) तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित (CM Devendra Fadanvis) असणार आहेत. यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे डॉ. तारा भवाळकर हे अध्यक्ष असून सरहद या संस्थेन संमेलनाचे नवी दिल्लीमध्ये आयोजन केले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता दिल्लीतील विज्ञान भवनात संमेलनाला सुरुवात होईल व २१ ते २३ फेब्रवारी दरम्यान या संमेलनात विविध साहित्यिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने २ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे.
दिल्लीमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नरेंद्र मोदी- शरद पवार- देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित राहताना दिसणार आहेत. मोदींच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, तर स्वागत अध्यक्ष म्हणून शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस या संमेलनाचे प्रमुख पाहुणे असतील.


प्रमुख नेते मंडळींची विशेष उपस्थिती :
राजधानी दिल्लीत आजपासून सुरू होणाऱ्या संमेलनाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, मंत्री उदय सामंत आणि आशीष शेलार, कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू आणि महाराष्ट्र विधानसभा उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासह आदि मंडळी संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
प्रथमेश पाटणकर, न्यूज अनकट प्रतिनिधी