Shaktikanta Das : रिझर्व बँक ऑफ इंदियाच्या गव्हर्नर पदावरून निवृत्त झाल्यानंतर शक्तिकांत दास यांच्यावर केंद्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. शक्तिकांत दास आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव म्हणून काम पाहणार आहेत. याबाबत केंद्र सरकारने आदेश काढला आहे. पंतप्रधान मोदींचे काम पहाणारे शक्तीकांत दास हे दुसरे प्रधान सचिव असतील. या अगोदर पी. के मिश्रा हे त्यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत आहेत. त्यांची नियुक्ती २०१९ मध्ये करण्यात आली होती. आता त्यांच्यासोबत शक्तिकांत दास काम करणार आहेत.
शक्तिकांत दास हे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते गेल्या ६ वर्षापासून RBI गव्हर्नर म्हणून काम करत होते. शक्तिकांत दास डिसेंबर २०२४ मध्ये निवृत्त झाले. आता प्रधान सचिव या नात्याने ते पंतप्रधानांना प्रमुख आर्थिक धोरणात्मक सल्ला देण्याची भूमिका ते बजावतील.


शक्तिकांत दास हे ओडिशाची राजधनी भुवनेश्वर रहिवासी आहेत.आपल्या कारकिर्दीत त्यांनी केंद्र सरकार आणि तमिळनाडू सरकारसाठी विविध पदांवर काम केले आहे. शक्तिकांत दास आरबीआयच्या गव्हर्नरपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली. संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी महसूल विभागाचे सचिव म्हणून काम पाहिलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर