१० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १९ वा हप्ता; तुमचे नाव असे तपसा.

51
PM Kisan 19th installment date 2025 PM Kisan Yojana Pm Nrendra Modi
१० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १९ वा हप्ता; तुमचे नाव असे तपसा.

PM Kisan 19th installment date 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान योजनेचा १९ वा हप्ता आज २४ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भागलपुरधुन किसान सन्मान निधी योजनेच्या सुमारे १० कोटी लभार्थी शेतकऱ्यांना अंदाजे २३,००० कोटी रुपये देणार आहेत. या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केले जणार आहेत.

या अगोदर या योजनेचा १८ वा हप्ता ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून दिला होता. त्यावेळी त्यांनी ९ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २०,००० हजार कोटी रुपयांची रक्कम दिली होती.

नेमकी ही योजना काय आहे.

या योजनेच्या मध्यमातून लहान आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत म्हणून ६ हजार रूपये दिले जातात. त्याचबरोबर ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केली जाते. ही योजना २४ फेब्रुवारी २०१९ ला सुरू झाली. असून या योजनेच्या माध्यमातून लाखो गरजू शेतकऱ्यांना मदत होत आहे.

असे पहाल तुमचे यादीत नाव –

१) पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा

२) उजव्या कोपऱ्यातील लाभार्थी यादी नावाच्या टॅबवर क्लिक करा.

३) वेबसाईट पेजवर खाली जा आणि राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉग आणि गाव यासारखे पर्याय निवडा

४) शेवटी अहवाल मिळवा टॅबवर क्लिक करा.

५) यानंतर तुम्ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत आहात की नाही याची माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर