Datta Gade Arrested Pune Police : पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची १३ पथके कामाला लागली होती. पण अखेर दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी आरोपीला गुणाट गावातून अटक केली आहे.
मंगळवारी ही घटना घडल्यानंतर आरोपी दत्ता गाडे फरार झाला होता. यामुळे स्वारगेट आगारात राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांकडून घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. सुरक्षा रक्षक असूनही इथे अशा घटना कशा घडतात असा सवाल राजकीय पक्षातील नेत्यांनी केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आपली १३ पथके आरोपीला शोधण्यासाठी रवाना केली होती. आरोपीने मागच्या काही दिवसांपासून कोणाकोणाशी फोनद्वारे संवाद साधला आहे अशा सर्वांची पोलिसांकडून तांत्रिकदृष्ट्या चौकशी केली जात होती. याच दरम्यान जो कोणी दत्ता गाडेला शोधून देईल त्याला एक लाखांच बक्षीस दिले जाईल असे देखील पोलिसांनी सांगितले होते. आरोपी हा कुठेही गेला नसून तो आपल्या शिरूर येथील गुणाट गावातच लपून बसला आहे. अशी माहिती मिळताच पुणे पोलिसांनी आरोपीच्या गावात ड्रोन आणि श्वान पथकाच्या माध्यमांतून शोध घेतला.
रात्री १२ वाजता नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी आला होता
दत्तात्रय गाडे रात्री १२ च्या सुमारस पाणी पिण्यासाठी आपल्या गुणाट गावातील नातेवाईकांकडे गेला होता. त्यावेळी “मला खूप पश्चाताप होत असून मला पोलिसांसमोर सरेंडर व्हायच” असल्याच नातेवाईकांना सांगून तिथून निघून गेला. ज्यावेळी दत्ता गाडे तिथून निघून गेला, तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी याबाबत सगळी माहिती पुणे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आपली शोध मोहीम कडक करून रात्री १.३० च्या सुमारास आरोपी दत्तात्रय गाडेला गुणाट गावातून अटक केली आहे. आज आरोपीला लष्कर पोलिस स्टेशन येथे आण्यात आले असून दुपारी १२ वाजता त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर