कोथरूड विकासकामांचा विळखा, नागरिकांचा जीव टांगणीला

25
कोथरूडमधील भेलकेनगर ते कोथरूड पोलिस स्टेशन दरम्यानच्या डीपी रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून खोदकामामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर आणि पदपथावर विद्युत वाहिनीच्या कामासाठी तब्बल आठ ते दहा ठिकाणी खोदकाम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
कोथरूड विकासकामांचा विळखा, नागरिकांचा जीव टांगणीला

Kothrud : कोथरूडमधील भेलकेनगर ते कोथरूड पोलिस स्टेशन दरम्यानच्या डीपी रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून खोदकामामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर आणि पदपथावर विद्युत वाहिनीच्या कामासाठी तब्बल आठ ते दहा ठिकाणी खोदकाम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

शाळा, महाविद्यालयांमुळे वाहतूक कोंडी

डीपी रस्त्यावर परांजपे शाळा, महेश विद्यालय यांसारख्या अनेक शाळा आणि महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. या रस्त्याचा वापर पालक, नोकरदार, कामगार आणि व्यावसायिकही मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, खोदकामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

महापालिका आणि महामेट्रोमध्ये समन्वयाचा अभाव

या कामाबाबत महामेट्रोकडून वेगवेगळी कारणे दिली जात आहेत, तर महापालिका प्रशासनही या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी महापालिका आणि मेट्रो अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.

लवकर काम पूर्ण करण्याची मागणी

विद्युत अभियंता अरुण धार्मिक यांनी सांगितले की, ठेकेदारांशी बोलणे झाले असून, मशिनरी आल्या आहेत आणि पाच ते सहा दिवसांत काम पूर्ण होईल. मात्र, नागरिकांना लवकरच या त्रासातून मुक्ती मिळावी, अशी अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा