पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आयसीसीच्या विरोधात निषेध; जाणून घ्या काय आहे कारण !

22
Pakistan Cricket Board protests against ICC; Know the reason!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आयसीसीच्या विरोधात निषेध नोंदविला आहे.

Pakistan Cricket Board protests against ICC : चॅम्पियन्स ट्रॉफीचा हंगाम संपला असून पीबीसी क्रिकेट बोर्डाने आयसीसी विरोधात निषेध नोंदवला आहे. चॅम्पियन्स करंडकाच्या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी स्पर्धेचे संचालक सुमेर अहमद यांना डावलल्यामूळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने हा निषेध व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते टीम इंडियातील खेळाडूंना जॅकेट देण्यात आले. त्याचबरोबर आयसीसीचे चेअरमेन जय शहा यांच्या हस्ते विश्वविजेत्या भारतीय संघाला जेतेपदाची ट्रॉफी देण्यात आली. यावेळी बीसीसीआयचे सचिव देवजित सायकिया व न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ रॉजर टुस देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

काय म्हणाले पाकिस्तान क्रिकेट बोर्ड :

या प्रकरणावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले की, बक्षीस वितरण सोहळ्याला सुमेद अहमद यांना तिथे उपस्थित असून सुद्धा व्यासपीठावर बोलवण्यात आले नाही. यावर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला जे कारण दिले, त्यावर अध्यक्ष मोहसिन नकवी समाधान नसल्याचे सांगितले जात आहेत. यामुळे पीबीसीकडून आयसीसीला विरोध करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा