भारताचे चायना बॅडमिंटन ओपनमधील आव्हान संपुष्टात, सात्विक आणि चिरागच्या पराभवाने बाहेर

पुणे, ६ सप्टेंबर २०२३ : सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या राष्ट्रकुल चॅम्पियन जोडीच्या पराभवाने, चायना बॅडमिंटन ओपन सुपर १००० स्पर्धेत भारताचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीचा जागतिक क्रमवारीत १३व्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहिबुल फिकरी आणि मौलाना बगास यांच्या जोडीने २१ ने पराभव केला.

बॅडमिंटन मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि रोहन कपूर यांना पहिल्या फेरीत मलेशियाच्या चेन तांग जी आणि तोह ई वेई यांच्याकडून १५ ने पराभव पत्करावा लागला. भारताचा एकही खेळाडू दुसरी फेरी गाठू शकला नाही. सात्विक आणि चिराग यांनी यावेळी निराशा केली. त्यांनी हंगामात स्विस ओपन सुपर, कोरिया ओपन आणि इंडोनेशिया ओपन सुपर स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली होती.

जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेता एचएस प्रणॉयलाही मलेशियाच्या आंग जी योंगकडून पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी राष्ट्रकुल चॅम्पियन लक्ष्य सेनलाही पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनकडून पराभव पत्करावा लागला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा