मुंबईमध्ये नवीन IICT संस्थेसाठी ४०० कोटींची मंजूरी; देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती.

35
A news thumbnail featuring the announcement of IICT Mumbai with ₹400 crore approval. The background showcases a modern educational institute, with the text 'IICT Mumbai' displayed. A circular inset shows the entrance of IIT Mumbai with its logo and name in Marathi and English. Devendra Fadnavis is prominently featured in the foreground, addressing the media
मुंबईमध्ये IICT संस्थेसाठी ४०० कोटींची मंजूरी.

Mumbai Frist IICT Institute : मुंबईमध्ये दरवर्षी IITअर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये देशभरातील अनेक विद्यार्थी प्रवेश घेत असतात. पण आता आयआयटीबरोबर IICT (Indian Institute of Creative Technology) देखील देशभरात शिक्षणाच्या नवीन संधी निर्माण करणार आहे. यासाठी ४०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. विशेषबाब म्हणजे पहिली IICT संस्था मुंबईमध्ये उभारली जाणार असून त्यासाठी गोरेगाव मधील फिल्म इंडस्ट्रीत जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईमध्ये १ ते ४ मे २०२५ दरम्यान वेव्हज २०२५’ या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होत. या संदर्भातल्या सत्राच आयोजन दिल्लीमधील सुषमा स्वराज भवनात करण्यात आल होत.यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस :

मुंबईत प्रथम उभारल्या जाणाऱ्या IICT संस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र पाहडणविस यांनी भाष्य केले आहे. नव्या संस्थेविषयी माहिती देताना ते म्हणाले की, “या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक स्तरावरील ‘क्रिएटिव्ह हब’ बनवण्याचा सरकारचा मानस असून केंद्र सरकारकडून या संस्थेच्या उभारणीसाठी ४०० कोटींची आर्थिक सहाय्यता दिली जाणार आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे.”

यानंतर पुढे फडणवीस म्हणाले, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, ही संस्था केवळ चित्रपट निर्मितीपर्यंत मर्यादित न राहता इथे डिजिटल कंटेंट, व्ही. एफ. एक्स (VFX), अॅनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब ३.० तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्यात येईल.

कंटेंट क्रियेशन क्षेत्राला चालना मिळणार :

मुंबई मध्ये उभारल्या जाणाऱ्या संस्थेमुळे कंटेंट क्रियेशन क्षेत्राला चालाना मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थीना या क्षेत्रात करियर करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, नवनवीन कल्पनांना चालना मिळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा