LSG vs MI IPL2025 Match: नमन धीरची आक्रमक खेळी, सूर्यकुमारचे शानदार अर्धशतक मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ मध्ये विजय मिळवून देईल असे वाटले होते, परंतु लखनऊ सुपर जायंट्सने आपल्या संघाची लाज राखत मुंबईवर १२ धावांनी विजय मिळवला. लखनऊने कालचा सामना जिंकून हंगामातील दुसरा विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये धाव घेतली आहे, तर हंगामातील तिसरा पराभव पत्करून मुंबई पॉइंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर येऊन थांबली आहे.
कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मान लखनऊ सुपर जायंट्सला दिला होता. यामध्ये हार्दिकने शानदार ५ विकेट्स घेत लखनऊला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.याशिवाय एकाच डावात पाच विकेट्स घेणारा तो आयपीएलच्या इतिहासातील पहिलाच कर्णधार ठरला. मिचेल मार्शची ६० धावांची शानदार खेळी, तर एडन मार्करमने ५३ धावा चोपल्या.यानंतर आयुष बदोनी ३० धावा आणि डेविड मिलरने २७ धावांची खेळी केली. यामुळे लखनऊचा संघ २० षटकांत ८ बाद २०३ धावा करू शकला.
दुसरीकडे २०४ लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात निराशाजनक राहिली. रोहित शर्माच्या जागी सलामी खेळी करण्यासाठी मैदाणात आलेला विलजैक्स ५ धावा करून घराकडे वळला. त्यानंतर शार्दुल ठाकुरने रायन रिकेल्टनला १० धावांवर असताना बाद केल. यांतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरला. दोघांनी मिळून ३ विकेट्ससाठी ३५ चेंडूत ६९ धावांची भागीदारी केली. नमन धीरने २४ चेंडूत ४ चुकार व ३ षटजकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या.दिग्वेज राठीने त्याला बाद केले.
ज्यावेळी मुंबईला विजयासाठी १८ चेंडूत ४० असताना दिग्वेजच्या १८ व्या षटकांत हार्दिक व तिलकने ११ धावा चोपल्या. यानंतर विजयासाठी १२ चेंडूत २९ धावा असताना तिलक वर्माने स्वत;ला रिटायार्ड म्हणून घोषित केले आणि २५ धावांवर तो घराकडे वळाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर