माथेरान मधील विकट गडावर भरकटलेल्या सात ट्रेकर्सची सुटका

15
Seven trekkers rescued in Matheran
माथेरान मधील विकट गडावर भरकटलेल्या सात ट्रेकर्सची सुटका

Seven trekkers rescued in Matheran: रायगड जिल्ह्यातील माथेरान परिसरातील विकट गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या सात ट्रेकर्स भरकटल्याची घटना रविवारी उघडकीस आली. हे सर्व ट्रेकर्स मुंबईतील पवई परिसरातील असून त्यांचा ट्रेकिंगदरम्यान गडावरचा मार्ग चुकला. भरकटल्यानंतर ग्रुपमधील एका ट्रेकरने तात्काळ ११२ क्रमांकावर कॉल करून मदतीची मागणी केली. त्यानंतर नेरळ पोलिस स्टेशनच्या पथकाने आणि स्थानिक आपत्कालीन सामाजिक संस्थांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्व ट्रेकर्सना सुखरूप शोधण्यात आले.

Seven trekkers rescued in Matheran

या ट्रेकर्समध्ये तेजस ठाकरे, निकिता जॉबे, हिबा फातिमा, निखिल सिंग, सोनू साहू, चेतन पाटील, आणि साहिल लेले यांचा समावेश आहे. यावेळी भरकटलेल्या ट्रेकर्सकडून नेरळ पोलिस स्टेशनच्या पथकाचे आणि स्थानिक आपत्कालीन सामाजिक संस्थांचे आभार मानण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी,माथेरान

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा