Kedar Jadhav Join BJP in Mumbai: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटच मैदान गाजवल्यानंतर लवकरच आता राजकारणाचं मैदान गाजवणार आहे. आज केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर अनेक क्रिकेटपटूनी राजकरणात प्रवेश केला आहे. त्याचाच अनुभव घेऊन केदार जाधव आता राजकारणात लवकरच एंट्री करणार आहे.
सूत्रांकडून अशी माहिती समोर आली आहे की, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव याचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. मुंबई येथील भाजपच्या कार्यालयात त्याच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
केदार जाधव मूळचा पुण्याचा असून त्यान भारतासाठी ७३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४२.०९ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या आहेत.यामध्ये २ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश असून गोलंदाजी करताना त्यान २७ विकेट्स घेतल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर