उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार ? युतीच्या चर्चेनंतर शिवसेनेने पोस्ट केला ” तो फोटो”

14
Uddhav and Raj Thackeray come together Municipal election
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार ?

Uddhav and Raj Thackeray come together? Municipal election: महानगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर राहिली असतानाच मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. याच प्रमुख कारण म्हणजे राज ठाकरेंनी एका मुलाखतीत केलेल वक्तव्य आणि उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात त्या वक्तव्याला दिलेला प्रतिसाद. शनिवारचा तो दिवस महाराष्ट्राच्या राजकरणात आणि कौटुंबिक इतिहासातील सोनेरी दिवस या एका बातमीने ढवळून निघालेला पाहायला मिळाला. याच दरम्यान शिवसेनेने एक फोटो शेअर केला ज्यात ठाकरे बंधु एकत्र दिसत आहे. यामुळे राज्याच्या राजकरणात चर्चेला उधाण फुटले आहे.

राज ठाकरे मुलाखतीत काय म्हणाले ?

कोणत्याही मोट्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. याच महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी वाद आणि भांडणं अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येण आणि एकत्र राहण यात मला काही कठीण गोष्ट वाटत नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षातील मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असे माझे म्हणणं आहे. जेव्हा मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंशिवाय मी कुणाच्या हाताखाली काम करत नव्हतो. उद्धव बरोबर काम तेव्हाही करत होतोच.

उद्धव ठाकरे यावर काय म्हणाले ?

आमच्यात असलेले किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. आम्ही लोकसभेच्या वेळी सांगत होतो की गुजरातमध्ये महाराष्ट्रातले उद्योग घेऊन जात आहेत,तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसल नसतं. आज महाराष्ट्राच्या हिताच विचार करणार सरकार केंद्रात बसवल असत आणि महाराष्ट्रात त्याच विचाराच सरकार बसल असत. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग परत तडजोड करायची अस नाही. महाराष्ट्राच हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी जाणार नाही त्याच स्वागत करणार नाही हे आधी ठरावा. मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडण नव्हतीच पण जी काही होती ती मिटवून टाकली चला.असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर