KKR vs GT Match Highlights: कोलकताच्या ईडन गार्डनवर पार पडलेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट राडर्सचा आमने-सामने आले होते. गतविजेता संघ या हंगामात संघर्ष करताना दिसून आला. यामुळे केकेआरला आपल्या होम ग्राऊंडवर पराभवाचा सामना करावा लागला.या समन्यात फलंदाजांनी शानदार कामगिरीनंतर गुजरातच्या गोलंदाजांचाही सुपर हीट शो पहायला मिळाला. याशिवाय शूबनम गिलच्या ९० धावांच्या जोरावर गुजरतने या सामन्यात ३९ धावांनी विजय मिळवला.
ईडन गार्डनवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुजरात संघाला नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदणात उतरावे लागले होते. गुजरात संघाने २० षटकात १९८ धावा केले. हा सामना जिंकण्यासाठी कोलकाताला १९९ धावांचा पाठलाग करावयाचा होता. कर्णधार अजिंक्य राहणेशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला केकेआरकडून चांगली कामगिरी करता आली नाही. अजिंक्यने अर्धशतक करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला हवी तशी साथ मिळाली नाही. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज १ तर सुनील नरेन १७ धावा करत घराकडे वळला. रिंकु सिगने विजयाचा पल्ला गाठण्यासाठी जोर लावला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
कोलकाता नाइट राईडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय त्यांना महागात पडला.कारण केकेआरच्या गोलंदाजांना गुजरात संघाच्या फलंदाजांच्या विकेट्स घेता आल्या नाही. गुजरात संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी मैदणात उतरलेल्या साई सुदर्शन आणि कर्णधार शूबनम गिलने पहिल्या षटकापासून केकेआरच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर