दुबईतील ‘त्रिविक्रम ढोल ताशा’ पथकाची महाराष्ट्र दिनाला आगळीवेगळी मानवंदना !

55
Maharashtra Day celebration in Dubai
‘त्रिविक्रम ढोल ताशा’ पथकाची महाराष्ट्र दिनाला आगळीवेगळी मानवंदना

Maharashtra Day celebration in Dubai: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दुबईमधील ‘त्रिविक्रम ढोल ताशा पथका’ने एक आगळीवेगळी आणि नावीन्य अशी मानवंदना सादर केली आहे. संयुक्त अरब अमिरातीत स्थायिक असूनही मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या परंपरेचे सातत्याने जतन करणाऱ्या या पथकाने यंदा UAE मधील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांवर ढोल-ताशांच्या गजरात महाराष्ट्र दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला.

गतवर्षी याच पथकाने यॉटवर वादन करून एक अनोखा अनुभव प्रेक्षकांना दिला होता. यंदाही त्यांनी नावीन्यपूर्णतेचा वारसा पुढे नेत, महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक UAE मधील विविध स्थळांवर पोहोचवली. ” ही मानवंदना केवळ महाराष्ट्रातील लोकांसाठीच नाही, तर जगभरातील रसिकांसाठी आहे”, असे यावेळी श्री. सागर पाटील यांनी सांगितले.

२०१७ साली आखाती देशात मानाचे पहिले ढोल ताशा पथक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘त्रिविक्रम’ पथकाच्या या उपक्रमाची संकल्पना संस्थापक अध्यक्ष श्री. सागर पाटील यांची होती. यावेळीच्या उपक्रमाचे संपूर्ण लेखन, दिग्दर्शन आणि छायाचित्रण त्यांनी स्वतः केले असून, पथकातील सदस्यांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर