IPL 2025 Suspended Indefinitely: पहलगाम हल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात जोरदार ताणतणाव सुरू झाला आहे. त्यामुळे आता याचा परिणाम इंडियन प्रीमियम लीगवर सुद्धा झालेला आपल्याला दिसून आला. धरमशाला येथे खेळवण्यात आलेला पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामाना मधूनच थांबवण्यात आला होता आणि नंतर तो रद्द करण्यात आला होता. तेव्हाच पुढील सामन्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. शुक्रवारी अखेर बीसीसीआयने आयपीलचे पुढील उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची घोषणा केली.
जम्मू काश्मीर मधील पाहलगाम येथे 22 एप्रिल रोजी भ्याड दहशदवादी हल्ला झाला. या हल्ल्याला सडेतोड उत्तर देताना भारतीय सैन्यांनी Operation Sindoor अंतर्गत पाकिस्तानमधील 9 दहशदवाड्याचे अड्डे उद्ध्वस्त केली. यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेलगत गुरुवारी रात्री दरून हल्ले केले. यात भारतीय जवानांकडून त्यांचे तीन लढाऊ विमाने पडली गेली. पाकिस्तानकडून यापुढेही कुरपती सुरूच राहणार असल्याची संकेत आहेत आणि भारतीय लष्कर त्यासाठी सज्ज आहे.
हा पर्याय उपलब्ध :
समोर आलेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तान यांच्यातील तणावजन्य परिस्थिचा आधी आढावा घेतला जाईल. ऑगस्ट मध्ये टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या कालावधीत भारतीय संघ तीन वनडे व तीन टी-20 सामने बांग्लादेश संघासोबत खेळणार आहे. पण सध्याच्या स्थितीचा विचार करता भारताचा बांग्लादेश दौरा होणार नसल्याचे संकेत सुद्धा समोर आले आहेत. त्यामुळे बीसीसीआय या ऑगस्टमध्ये आयपीएलचे उर्वरित सामने घेण्याचा विचार करेल.पण भारतात तेव्हा पावसाळा असल्याने हे सामने दुसऱ्या देशात खेळवण्यात येतील.
जर वरील पर्याय काही कारणास्तव यशस्वी न झाल्यास बीसीसीआय आशिया चषक स्पर्धेच्या विंडोचा वापर करु शकते. ही स्पर्धा सप्टेंबर मध्ये होणार आहे. त्यामुळे तेव्हा देखील आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाऊ शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर