अँजेलो मॅथ्यूज प्रकरणानंतर शाकिब अल हसन वर्ल्ड कपमधून बाहेर

पुणे, ७ नोव्हेंबर २०२३ : ICC ODI विश्वचषक २०२३ मध्ये सोमवारी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. जिथे बांगलादेशने ३ विकेट्सने विजय मिळवला. शाकिब अल हसनच्या अपीलवर अँजेलो मॅथ्यूजला बाद घोषित करण्यात आल्याने या सामन्यात गोंधळ उडाला होता. मात्र, या सगळ्यापेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

या स्पर्धेत बांगलादेशने आतापर्यंत आठ साखळी सामने खेळले आहेत. आता संघाचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असुन त्या आधीच बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे, कारण कर्णधार शाकिब अल हसन स्पर्धेबाहेर गेला आहे. स्पर्धेतील ३८व्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करताना शाकिबला डाव्या हाताच्या तर्जनीला दुखापत झाली होती. या कारणास्तव, आता तो आपल्या संघासाठी शेवटचा साखळी सामना खेळू शकणार नाही.

श्रीलंकेविरुद्ध खेळताना शाकिब अल हसनच्या डाव्या हाताच्या तर्जनीला दुखापत झाली. सामन्यानंतर त्याच्या बोटाचा एक्स-रे करण्यात आला, जिथे फ्रॅक्चरची पुष्टी झाली. त्यामुळे आता हा डावखुरा अष्टपैलू खेळाडू शेवटचा साखळी सामना खेळण्यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा