ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धविरामाची ऐतिहासिक घोषणा..

40
अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांमध्ये शांततेचा नवा अध्याय सुरू
अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांमध्ये शांततेचा नवा अध्याय सुरू

India and Pakistan after ‘Operation Sindoor:भारताने नुकतेच केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या उच्चस्तरीय लष्करी कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. मात्र या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी अचानक एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, सर्व लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संचालन महासंचालकांमध्ये टेलिफोनद्वारे संवाद झाला. यामध्ये दोन्ही बाजूंनी जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सर्व प्रकारच्या गोळीबार व लष्करी कारवाया थांबवण्याचे ठरवले.

अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांमध्ये शांततेचा नवा अध्याय सुरू

ऑपरेशन सिंदूर: नेमकं काय घडलं?

‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताची पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (PoK) आणि नियंत्रण रेषेजवळील (LoC) दहशतवादी तळांवर केंद्रित केलेली कारवाई होती. भारतात झालेल्या एका गंभीर दहशतवादी हल्ल्यानंतर ही कृती करण्यात आली.
भारतीय लष्कराने हे ऑपरेशन अत्यंत नियोजित पद्धतीने राबवले. यामध्ये – जमिनीवर सीमांवर मोठ्या प्रमाणात लष्करी तुकड्या, टँक, तोफा व स्नायपर्स तैनात करण्यात आले. हवाई क्षेत्रात भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांनी आपली लढाऊ विमाने सज्ज ठेवली; PoK सीमेवर हवाई क्षेत्र उल्लंघनाच्या घटना घडल्या.समुद्रात भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन सी शील्ड’ अंतर्गत अरबी समुद्रात युद्धनौकांची तैनाती केली. पाकिस्ताननेही ग्वादर आणि मकरान किनारपट्टीवर सज्जता वाढवली.या हालचालींमुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती.

अचानक युद्धविरामाची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा करत सांगितले की, अमेरिका, भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या चर्चेच्या फेरीनंतर दोन्ही देशांनी तात्काळ आणि पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली आहे.”हा निर्णय केवळ लष्करी कारवाया थांबवण्यापुरता मर्यादित नसून, तो दक्षिण आशियातील शांती व स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल ठरत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्वीट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्वीट

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत म्हणाले –

भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार व लष्करी कारवाया थांबवण्यावर समजूत तयार केली आहे. भारताने दहशतवादाच्या सर्व स्वरूपांबाबत नेहमीच कठोर आणि ठाम भूमिका घेतली आहे आणि ती पुढेही कायम राहील.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

न्यूज अनकट प्रतिनिधि – राजश्री भोसले