Criminal Complaint Defamation Hate Speech: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यूएसमध्ये गेल्या महिन्यात एका संवाद सत्रात भगवान राम यांना ‘काल्पनिक’ व्यक्ती म्हणून संबोधल्याच्या कथित वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.ही तक्रार अॅड. हरी शंकर पांडे यांनी वाराणसी येथील ACJM (MP/MLA) कोर्टात दाखल केली आहे. त्यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याला ‘द्वेषपूर्ण’ आणि ‘विवादास्पद’ असे म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय ?
2024 मध्ये काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका संवाद सत्रात भाग घेतला होता. या सत्रात त्यांनी भगवान राम यांचा उल्लेख “काल्पनिक पात्र” (mythological figure) म्हणून केल्याचं वृत्त समोर आलं.त्यांच्या या विधानामुळे भारतात अनेक हिंदू संघटना व सनातन धर्म मानणाऱ्या लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. भगवान राम हे हिंदू धर्मातील आदर्श आणि पूज्य व्यक्तिमत्त्व असल्याने, त्यांच्याविषयी अशा प्रकारचे विधान हे धार्मिक भावना दुखावणारे असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं.
या पार्श्वभूमीवर, अॅड. हरी शंकर पांडे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात वाराणसी येथील ACJM (MP/MLA) न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली. या तक्रारीत म्हटलं आहे की, राहुल गांधी सतत सनातन धर्मातील अवतार, महापुरुष व प्रतीकांबाबत अपमानास्पद आणि बिनधास्त विधाने करत असतात, आणि त्यामुळे सनातन धर्म मानणाऱ्या हिंदूंचा अपमान केला जातो.
ACJM न्यायालय म्हणजे काय?
ACJM म्हणजे Additional Chief Judicial Magistrate (अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी).
हे फौजदारी न्यायालयाचे एक मध्यम स्तराचे कोर्ट आहे जे राज्य न्यायव्यवस्थेचा भाग आहे.
ACJM न्यायालयात कोणती प्रकरणं घेतली जातात?
फौजदारी गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणं, जिथे शिक्षा 7 वर्षांपर्यंत असू शकते. त्यातमध्ये मारहाण, फसवणूक, चोरी, धमकी देणे, धार्मिकभावना दुखावणे, मानहानी आणि राजकीय व्यक्ती जस की खासदार, आमदार यांच्याशी संबंधित खटले
काही जिल्ह्यांमध्ये MP/MLA कोर्ट म्हणूनही ACJM काम करतं.
या सर्व बाबी लक्षात घेता, तक्रारदाराने राहुल गांधींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 356, 351, 353 आणि 196 नुसार गुन्हा नोंदवून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कलम ३५६ (BNS 2023) काय सांगतो बघुयात
हा कलम त्या व्यक्तींविरोधात लागू होतो जे जाणूनबुजून जाहीर ठिकाणी हिंसक वर्तन करतात, गोंधळ करतात, किंवा इतर कोणत्याही प्रकारे शांतता भंग करतात.
कलम ३५१ ( BNS 2023) काय सांगतो बघुयात
जर एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक अशी वक्तव्ये, लिखाण, चित्र, किंवा इतर कोणतीही कृती करते ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा समाजात कमी होते किंवा तो अपमानित होतो, तर ती मानहानी ठरते.
कलम ३५३ ( BNS 2023 ) काय सांगतो बघुयात
जर कोणी व्यक्ती सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असताना त्याला शारीरिक शक्तीचा वापर करून किंवा धाक दाखवून अडथळा निर्माण करते, तर त्यावर ही कलम लागू होते.
कलम १९६ ( BNS ) काय सांगतो बघुयात
जर एखाद्या व्यक्तीने असे वक्तव्य, लेखन, कृती केली की जी राष्ट्रविरोधी उद्देशाने सरकारच्या विरुद्ध द्वेष निर्माण करताना दिसते
सरकारी कर्मचारी/सेवकांवर किंवा न्यायप्रणालीविरोधात अपमानास्पद वक्तव्य होताना दिसतंय आणि सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणारे वक्तव्य होत असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी, राजश्री भोसले