आतंकाच्या विरोधात भारताने आखली लक्ष्मण रेषा,आदमपूर एअरबेसवरून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

39
'भारत माता की जय' हे केवळ घोषवाक्य नाही.

PM Modi Visit Adampur Airbase: पंजाबमधील आदमपूर हवाई तळावर भारतीय वायुदलाच्या जवानांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठाम इशारा दिला. दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा त्यांनी ठामपणे पर्दाफाश केला.

‘भारत माता की जय’ हे केवळ घोषवाक्य नाही.

पंजाबमधील आदमपूर हवाई तळावर भारतीय वायुदलाच्या जवानांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,जेव्हा आमच्या बहिणींच्या, मुलींच्या कपाळावरील सिंदूर हिरावला गेला, तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांचा नायनाट केला.त्यांनी भ्याडांप्रमाणे लपून हल्ला करायला आले होते. पण त्यांनी विसरलं की ज्याला त्यांनी ललकारलं, ती हिंदुस्थानची सेना आहे.पुढे ते वायुदलाला उद्देशून म्हणाले, वायुदल समोरासमोर हल्ला करून त्यांचा खात्मा केला.तुम्ही दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली आणि शंभराहून अधिक दहशतवाद्यांचा नायनाट केला. आता त्यांच्या आक्यांनीही समजून घेतलं आहे की भारताकडे वाकडं पाहण्याचा एकच शेवट आहे – विनाश!

दहशतवादाविरुद्ध भारताची लक्ष्मण रेषा ठाम आणि स्पष्ट आहे. दहशतवादाविरुद्ध भारताची लक्ष्मण रेषा आता ठाम आणि स्पष्ट आहे. जर पुन्हा भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर भारत जबरदस्त उत्तर देईल.

ऑपरेशन सिंदूर’ हे आता भारताचं न्यू नॉर्मल आहे.ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या नीती, नियत आणि निर्णयक्षमतेची त्रिवेणी आहे.
आपल्या वायुदलाच्या पराक्रमामुळेच आज ‘ऑपरेशन सिंदूर’चा जयघोष देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात ऐकू येतो आहे. या ऑपरेशनदरम्यान संपूर्ण भारत तुमच्यासोबत उभा होता. असं ते वायुदलाला उद्देशून म्हणाले.

आज प्रत्येक देशवासी आपल्या भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंब सदस्य यांच्या प्रती कृतज्ञ आहे. ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक सामान्य लष्करी कारवाई नाही, तर भारताच्या नीती, नियत आणि निर्णायक क्षमतेचे प्रतीक आहे.

अनकट प्रतिनिधि – ऐश्वर्या शिलवंत