नवरा असावा तर सूर्याभाऊ सारखा एकाच सामन्यांत बायकोची ईच्छा केली पूर्ण; नेमका विषय काय जाणून घ्या.

15
Suryakumar Yadav Statement After Wining Match in Wife
नवरा असावा तर सूर्याभाऊ सारखा एकाच सामन्यांत बायकोची ईच्छा केली पूर्ण; नेमका विषय काय जाणून घ्या.

Suryakumar Yadav Statement After Wining Match: मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडीयमवर राजधानी दिल्लीचा 59 धावांनी दमदार पराभव करत आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये थाटात एन्ट्री केली. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव, मिचेल सँटनर,नमन धीर,जसप्रीत बूमराह यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीचा पराभव केला. या विजया नंतर सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामना सुरू होण्यापूर्वी पत्नीने सकाळी सांगितलेली गोष्ट सूर्याने एकाच सामन्यात पूर्ण केली.

वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेला सामना हा दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा होता. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी संघर्ष करताना दिसले. दिल्ली कॅपिटल संघाने प्रथम नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदाणात उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवात चांगली राहिली नाही. त्यांनी पॉवर प्लेमध्ये आपले 3 गडी गमावले होते. त्यामुळे मुंबई संघाची अवस्था बिकट झाली होती. अशातच चौथ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी मैदनात उतरलेल्या सूर्याने मुंबई संघाची गाडी सांभाळली. त्याने 43 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 73 धावा केल्या आणि नाबाद परतला. शेवटच्या दोन षटकांत नमन धीरने नाबाद 24 धावा करत महत्वपूर्ण योगदान दिले. परिणामी मुंबईने पाच विकेट्स गामावतक 180 धावा केल्या. याला प्रतिउत्तरस दिल्ली कॅपिटलचा संघ 18.2 षटकांत 121 धावांवर गारद झाला.

काय आहे नेमका विषय :

सामना जिंकल्यानंतर सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी सूर्यकुमार यादव छत्री घेऊन पुढे आला होता, याचदरम्यान बोलताना सूर्याकुमार म्हणाला की, आतापर्यंत 13 सामने खेळले गेले आहेत. माझ्या पत्नीने आज मला सकाळी गोष्ट सांगितली. ती म्हणाली की, तुला सर्व पुरस्कार मिळाले आहेत, पण मन ऑफ द मॅच पुरस्कार मिळालेला नाही. त्यामुळे आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे. सूर्यकुमार पुढे म्हणाला, संघाच्या दृष्टीकोणातून ही खेळी महत्वाची होती आणि ही ट्रॉफी देखील तिच्यासाठी खास आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर