10 crore tree plantation in Maharashtra: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच पुढील वर्षीही १० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल.त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे,अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यातील ३३ टक्के वनाच्छदनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील २० वर्षे हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र हे अभियान मोहिम स्वरुपात राबविणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने गेल्या आठ वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे.यापूर्वी ३३ कोटी आणि ५० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे.त्यामुळे यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करता येईल.राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. देशात सर्वाधिक वनाच्छदन वाढविण्यात महाराष्ट्रात अग्रेसर आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक पेड माँ के नाम या अभियानात महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील ३३ टक्के वनाच्छदनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील १० वर्षे हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र हे अभियान मोहिम स्वरुपात राबविणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने गेल्या आठ वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे.वृक्षारोपणात किमान दीड ते तीन वर्षे वयाची रोपे लावण्यात यावीत.लावलेली झाडे टिकतील, वाढतील यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच लावलेल्या वृक्षारोपणाची जगण्याची टक्केवारी वाढावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच यासाठी रिमोट सेन्सिंग, उपग्रह आदी साधनांचाही वापर करून पारदर्शकपणे कामे होण्याकडे लक्ष द्यावे असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी, तनया रेडकर












































