पतजंलीची ५ लाखांची बिस्किटे चोरणाऱ्या दोघांना अटक

32

अहमदनगर : पतजंली कंपनीचे ५ लाखांची बिस्कीट चोरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी मालमोटारीसह अटक केली आहे.
या दोघांकडून ६ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संतोष आव्हाड व यशवंत कदम (रा. टेंभुर्णी जि.सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ डिसेंबरला वाळुंज (जि.औरंगाबाद) येथून आयशरमध्ये ५ लाख २७ हजार ४२७ रूपये किंमतीचे पतजंली कंपनीचे बिस्कीट घेऊन गाडी चालक गणेश सावंत व संतोष शिर्के हे पुण्याच्या दिशेने निघाले होते.

आयशर पांढरी पूलावर आला असता डिझेल संपल्याने आयशरला पांढरी पूलावर लावून चालक गणेश सावंत हे आयशरमध्येच झोपले व संतोष शिर्के निघून गेले.
रात्री साडेबाराच्या सुमारास दोघा अनोळखी इसमांनी सावंत यांना मारहाण करून आयशरमध्ये डिझेल टाकले व आयशर सावंत यांच्यासह टेंभुर्णीकडे घेऊन गेले.
सावंत यांना टेंभुर्णी येथे सोडून आयशर सोलापूरच्या दिशेने घेऊन गेले. याप्रकरणी अशोक शंकरराव क्षिरसागर यांनी २० डिसेंबरला एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.