युनायटेड अरब अमिरातीतील अबुधाबी आता होणार ढोल-ताशांच्या गजराने दणाणून!
त्रिविक्रम ढोल ताशा पथकाच्या नव्या शाखेचा भव्य शुभारंभ अबुधाबीत पार पडला आहे.
त्रिविक्रम दुबईचे संस्थापक सागर पाटील यांनी २०१७ साली आखाती देशातले पहिलं ढोल-ताशा पथक स्थापन करून विश्वविक्रम रचला होता. आता त्यांनी अबुधाबीतील स्थानिक कलाकारांमधूनच नवे वादक तयार करून त्रिविक्रम अबुधाबी शाखेची धमाकेदार सुरुवात केली आहे.
आता या नव्या शाखेतून अबुधाबीतील सर्व संस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ढोल-ताशांचा नाद दुमदुमणार आहे. सागर पाटील म्हणाले, “ही शाखा त्रिविक्रमच्या परंपरेचा वारसा जपत महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि परंपरा जगभर पोहोचवेल.”
नव्या वादकांचं दणक्यात स्वागत करण्यात आलं आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदनही करण्यात आलं.
या आंतरराष्ट्रीय ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून भारतीय कला आणि महाराष्ट्राची संस्कृती जगभर पोहोचवणाऱ्या सागर पाटील यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय!
न्यूज अनकट प्रतिनिधी वैभव वाईकर












































