चंकी पांडे आता मराठी चित्रपटसृष्टीत

मुंबई : आपल्या विनोदांनी नव्वदीच्या दशकात प्रेक्षकांना पोट धरुन हसवणारा बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे आता मराठी चित्रपटात झळकणार आहे. अशी चर्चा आहे.
चंकी पांडे ‘विकून टाक’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. परंतु या चित्रपटात तो कोणती भूमिका साकारणार हे मात्र अजून समजू शकलं नाही.
याबाबत चंकी म्हणाला की, मला मराठी चित्रपटामध्ये काम करायचे होते. मराठी भाषेत सर्वात चांगले विनोदी चित्रपट होऊ शकतात असे मला वाटले. तसेच ‘घेऊन टाक’ हे माझे आवडते मराठी वाक्य आहे. हा चित्रपट करण्यामागे आणखीही खूप कारणे आहेत. मराठी चित्रपटात काम करणे हे माझ्या बकेट लिस्टमध्ये होते.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर पाटील यांचे असून चित्रपट येत्या वर्षी ३१ जानेवारीला रिलीज होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा