पुणे जिल्ह्यात जवळपास ५० हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अजूनही प्रलंबित असून, यापैकी सुमारे १० हजार मुलांकडे तर आधार कार्डच नाही. शासनाने सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत दिली आहे.
U-DISE पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंद आणि आधारची पडताळणी करणे बंधनकारक आहे. या मुदतीनंतर कोणतेही अपडेट स्वीकारले जाणार नाही, त्यामुळे पालक व शाळा प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आधार अपडेट न झाल्यास मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, सायकल वाटप, शिष्यवृत्ती यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार नाही. यामुळे शाळांच्या संचमान्यतेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन नाव, जन्मतारीख किंवा इतर माहितीमधील चुका दुरुस्त करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे










































.jpeg?updatedAt=1699278910133)
